सात सुरांनी सजते जशी
संगीताची मैफिल
माझ्या सख्यांसोबत रंगते
आमची गप्पांची मैफिल
सोबतीने जातो आम्ही
गप्पांच्या गावा अन
सर्वांनाच वाटतो आमच्या
मैत्रीचा हेवा
बोलण्यासाठी आम्हाला
चार क्षण पुरतात पण
संसाराच्या राम रगाड्यात
ते ही कुठे मिळतात
मुलांच्या शाळेनिमित्ताने
पूर्वी नेहमी भेटायचो
हळदीकंकू,वाढदिवस सेलिब्रेशन
गप्पांचे फड जमवायंचो
कोरोना ने आमची
लावली आहे वाट
गप्पा ही साठल्या आहेत
मनात सतराशे साठ
तुम्ही म्हणाल फोर जी (4G) च्या
जमान्यात काहीच अवघड नाही
पण खर सांगू मनापासून
गळाभे टी ची मजा मोबाईल मध्ये नाही
प्रार्थना करते देवा
सर्व पूर्वीसारखे कर
अन् जमू दे परत
आमचे गप्पांचे फड
रजनी

13 comments:
Must
Thank you
मस्त 👌👌
वाह, खुपच छान, keep it up
Khup chan 👌👌
खुप छान भावना व्यक्त केल्या आहेत... लवकरच सगळं पूर्वीसारख होईल. 👍🏻
Thank you dear hubby.
Thank you
धन्यवाद सर
Thank you
Thank you
जुने मैञी सान्निध्यातील दिवस आठवले. मनाला सुखद, हळुवार ते क्षण सुखावू गेले.
धन्यवाद 😊😊
Post a Comment