ग्रुप मधला दुसरा तो ,हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघण्याखेरीज दुसरे काहीच करू शकत नव्हता.एक दिवस अचानक तिच्या डोळ्यांवरची त्याचा प्रेमाची झापडे गळून पडली.ती मग आणखीनच आपल्या कोषात गेली.
आता मात्र त्याने ठरविले ,काही ही झाले तरी तिला परत पहिल्यासारखे करायचे.तिच्या एक मैत्रिणीच्या मदतीने तो जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवू लागला.तिचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू लागला.हळूहळू तिचं लाईफ नॉर्मल होऊ लागलं.हे सर्व करताना खरंच तो तिच्या प्रेमात पडला.
इतक्या दिवसांच्या सहवासाने तो किती सच्चा आहे ,हे तिला जाणवलं होत .त्याने न सांगताच त्याचं प्रेमही तिला कळलं होतं.अखेर त्याच्या मुळेच तर तिला तिचा आत्मविश्वास परत मिळाला होता.ती पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकली होती.त्याच म्हणणं तिला पटलं होत ,जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकत नाही ती इतरांवर कशी प्रेम करणार.म्हणूनच आज ती दुसऱ्यांदा प्रेमात पडली होती आणि ही दुसऱ्या प्रेमाची पहिली गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवणार होती.
रजनी

No comments:
Post a Comment